थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 41 व्या सर्वसाधारण सभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला. पटलावरील प्रामुख्याने घेतलेल्या विषयांमध्ये “कारखान्याच्या मालकीची सुमारे 99. 27 एकर जमीन ही कृषी उत्पन्न बाजार समितीला विकणे’ यावर ही सर्वसाधारण सभा गाजणार हे अगोदरच अभिप्रेत होते आज ही सर्वसाधारण सभा थेऊर येथील वृंदावन पॅलेस मंगल कार्यालयात पार पडली सभेचे अध्यक्ष कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सभासदांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे या सभेत नेमके काय होणार याबद्दल उपस्थितीमध्ये औत्सुक्य निर्माण झाले होते.या सभेत महिला सभासदांची उपस्थिती लक्षनीय होती.सुरुवातीला कारखान्याच्या सर्वसाधारण सभेचे ठिकाण बदलण्यावर सभासदांनी आक्षेप घेतला आतापर्यंत इतिहासात कारखाना स्थळाबाहेर ही सर्वसाधारण सभा झालेली नव्हती.
कारखान्याचे कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी कार्यक्रम पत्रिका वाचण्यास सुरुवात केली यावर काही सभासदांनी त्यांच्या नियुक्तीच्या वरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला यावर झालेल्या गोंधळानंतर विषय पत्रिकेवरील एकेक विषय घेण्याचे ठरले आणि यातील पहिला विषय जो मागील सभेचा इतिवृत्त वाचून कायम करणे यावर इतिवृत्त वाचण्यास सुरुवात झाली. यावर कार्यकारी संचालक यांच्या नियुक्ती वरच काही सभासदांनी हरकत घेऊन त्यांना काही प्रश्न विचारले दरम्यान गोंधळ झाला.
कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी विषय पत्रिकेवरील एकेक विषय मांडून त्यावर सविस्तर चर्चा करण्याची विनंती केली त्यानुसार विषय पत्रिकेवरील पहिला विषय घेण्यात आला यामध्ये मागील सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आलेल्या ठरावांचे इतिवृत्त वाचन करण्यात आले यावर सभासदांनी त्यातील सभासदांची देणे दिली का हा प्रश्न करून त्यावर संचालक मंडळाने माहिती द्यावी असे विनंती केली परंतु कारखान्याकडे तिजोरीत एकही रुपया नाही यासाठीच आपण जमीन विक्रीचा मार्ग अवलंबला आहे ज्यावेळी कारखान्याकडे पैसे येतील तेव्हाच यावर मार्ग काढता येईल असे संचालक मंडळाने सांगितले यावर सभासदांचे समाधान झाले नाही त्यानंतर गोंधळाचे वातावरण तयार झाले.
यावर उपस्थित सभासद विकास लवांडे यांनी सहकार नियमानुसार सभा घेण्याची विनंती केली कारण एका सभेचे इतिवृत्त पुढील सभेमध्ये घेऊन त्यास मंजुरी दिली जाते त्यानुसार आजच्या सभेत केवळ पाठीमागच्या सभेतील म्हणजे 2023 मधील सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची चर्चा घेऊन ते यात येथे वृत्तास मंजुरी मागणी अपेक्षित होते परंतु पटलावरील पहिला विषय सन 2010 मध्ये पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत घेण्यात आले होते. यावर त्यांनी आक्षेप घेतला
तेव्हा कार्यकारी संचालक आणि पुढील विषय वाचण्यास सुरुवात केली असता सभासद आक्रमक झाले आणि त्यांना थांबविण्यासाठी आरडाओरडा केला. यावर कारखान्याचे संचालक मोरेश्वर काळे यांनी विषय पत्रिका हातात घेऊन विषय क्रमांक दोन पासून सर्व विषय वाचून काढले आणि हात उंचावून सभासदांना विषय मंजूर आहेत का असा प्रश्न केला त्यावर अभूतपूर्व गोंधळ झाला आणि ह्या गोंधळात आवाजी मतदानाने विषय मंजूर झाल्याचे संचालक मंडळाने जाहीर केले या सर्व घडामोडीवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत ही लोकशाहीची हत्या आहे हे आम्हाला मान्य नाही अशा घोषणा करत होते अशातच संचालक मंडळाने राष्ट्रगीत घेण्यासाठी सर्वांना जागेवर उभे राहण्याची विनंती केली आणि राष्ट्रगीत घेऊन ही सभा मोठ्या गोंधळातच पार पडली.
