थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) लोणीकाळभोर पोलिसांनी थेऊर नायगाव सीमेवर अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल दोन लाख पस्तीस हजार र (२,३५०००/-) रुपये किमतीची 10 कॅन तयार हातभट्टी दारू जप्त केली.
  लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून सध्या अवैध धंदेवाल्यांवर कडक कारवाईची मोहीम जोरात सुरू असून लोणी काळभोर पोलिसांनी दारू मटका जुगार यावर सातत्याने कारवाई चालू ठेवली आहे आज रविवारी (दिं२३) रोजी बातमीदारामार्फत सकाळच्या सुमारास थेऊर गावच्या हद्दीत नायगाव ते थेऊर शिवरस्त्यावर  एक जण त्याच्या चारचाकी गाडीतुन गावठी हातभट्टीची तयार दारुचे कॅन्डची वाहतुक करत असल्याची बातमी मिळाली असता लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवालदार विजय जाधव, प्रशांत सुतार, सागर कदम, यांनी तेथे सापळा लावला असता गावठी हातभट्टीची तयार दारु वाहतुक करणारी मारुती कंपनीची स्विफ्ट डिजायर  (एम.एच १२ एफ एफ ७४५७) कार पकडली त्यात पोलीसांना गावठी हातभट्टीचे तयार दारुने भरलेले एकुण १० कॅन्ड एकुण ३५० लीटर दारु जप्त करण्यात आली.  अवैध्य गावठी हातभट्टी दारुची वाहतूक करणारा संदिप प्रताप जाधव, (वय-२५ वर्षे, धंदा मजुरी, रा. मारुती कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यास ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यात गाडीसह २,३५,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
             ही कारवाई  पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग  मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०५ डॉ राजकुमार शिंदे,सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे,अमित घोडके व पोलीस हवालदार विजय जाधव, प्रशांत सुतार, सागर कदम यांनी केली.
         पुढील तपास पोलीस हवालदार विजय जाधव करीत आहेत.
“अवैध्य धंदयावरील या कारवायांमुळे लोणीकाळभोर परिसरातील सर्व अवैध्य धंदे चालकांचे अवैध्य धंदे व अनाधिकृत कृत्यांना चांगलाच चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध्य धंद्याचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *