केसनंद -(हवेलीनामा वृत्तसेवा) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने केसनंद(ता.हवेली) येथील ऑप्टिमा हाइट्स सोसायटी मध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव अतिशय थाटामाटात साजरा करण्यात आला यात धार्मिक कार्यक्रमासह संस्कृतीक कार्यक्रम साजरे करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला दिवसभर सोसायटी मध्ये भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले यात सोसायटीतील बाल शिवभक्त तसेच महिला भगिनी जेष्ठ नागरिक यांनी भगवे फेटे बांधून महिला मंडळी कडून लेझीम खेळ खेळण्यात आला. शिव व्याख्यान, लहान मुलांचे चित्रकलाच्या स्पर्धा झाल्या तसेच शिवजयंती निमित्ताने सोसायटीच्या वतीने अनाथ आश्रमात लागणाऱ्या शालेय उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची ढोलताशांच्या गजरात भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली जागोजागी महिला मंडळींनी रांगोळी काढली होती सोसायटीच्या आवारात सर्वत्र भगव्या पताका भगवे ध्वज लावण्यात आले होते त्यामुळे सोसायटीतील वातावरण भगवेमय झाले होते. मिरवणूकीची सांगता झाल्यानंतर शिवभक्तांनी महाप्रसाद घेतला.
