पुणे (हवेलीनामा वृतसमूह) मोक्का तसेच दरोडा तयारी यासारख्या गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेले दोन सराईत गुन्हेगार हडपसर येथून गुन्हे शाखेच्या युनिट सहा ने गजाआड केले असून त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट ६ हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना माहिती मिळाली की, दिघी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड चे अभिलेखावरील मकोका व दरोड्याची तयारी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार दोन गुन्हेगार स्क्रीन नंबर 2, वैभव टॉकीज, हडपसर येथे छावा चित्रपट पाहण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाल्याने युनिट 6 कडील सहाय्य्क पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पोलीस कर्मचारी यांनी तेथे जाऊन दिघी पोलीस स्टेशनला MCOCA कलम 3(1)(ii),3(4) मधील पाहिजे असलेला गुन्हेगार धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा वय 22 वर्षे रा. शिव कॉलनी नंबर 4 आदर्श नगर दिघी पुणे 😁व बादशहशिंग पोलादसिंग भोंड वय 23 वर्षे, रा. शिव कॉलनी नंबर 4 आदर्श नगर दिघी पुणे यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी दिघी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट – ६ चे अतिरिक्त कार्यभार प्रभारी पोलीस निरीक्षक छगन कापसे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली.
