इंदापूर -(हवेलीनामा वृत्तसेवा) स्थानिक गुन्हे शाखा व वालचंद नगर पोलीस स्टेशन यांची अंमली पदार्थाची शेती करणाऱ्यावर मोठी कारवाई शेतीत शेती मालात अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी बेकायदेशीर विनापरवाना लागवड करण्यात आलेल्या अफुच्या शेतीवर कारवाई करत एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्हावी (ता.इंदापूर) येथे अंमली पदार्थ शेतीवर कारवाई. अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर विनापरवाना लागवड करून उत्पादन घेवून विक्री केल्यामुळे कमी कालावधीत झटपट पैसा कमविता येतो अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे. यातूनच कायद्याचा भंग करून काही लोक शेतीच्या नावाखाली शेती मालात अफु, गांजा सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड करून उत्पादन घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे स्वप्निल अहिवळे गस्त घालत असताना बातमीदारामार्फत अफूच्या शेती माहिती मिळाली असता मिळालेल्या बातमीची खातर जमा करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता ( न्हावी ता. इंदापूर जि. पुणे) गावच्या हद्दीत रतन कुंडलिक मारकड व बाळु बाबुराव जाधव यांनी शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफुच्या झाडांची लागवड विक्री करणेच्या उद्देशाने करून उत्पादन घेतले आहे, अशी बातमी मिळाली. राजपत्रीत अधिकरी, पंच तसेच महसुल विभाग, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह न्हावी गावात जावून मिळालेल्या बातमीचे आधारे  शेतात जावून पाहणी करून कारवाई केली असता, शेतामध्ये उपस्थित रतन कुंडलिक मारकड (वय ५० वर्षे,)  बाळु बाबुराव जाधव, वय (५४ वर्षे, दोघे रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी शेतांमध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले, त्या दरम्यान त्याच परिसरातील  कल्याण बाबुराव जाधव (वय ६५ वर्षे रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे) हे त्यांच्या शेतात उपस्थित असताना त्या शेताची पाहणी केली असता त्या शेतांमध्ये देखील अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आल्याने त्यांना  ताब्यात घेतले
अफुची लागवड केलेली दिसून येवू नये याकरीता शेतात कांदा व लसून पिकांची लागवड करून चारही बाजूने मका या पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले होते. कारवाई दरम्यान एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करण्यात आली.
सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक  गणेश बिरादार, यांच्या मार्गर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या  पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, वालचंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे,  सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस अंमलदार स्वप्निल अहीवळे, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, अजय घुले, ईश्वर जाधव, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, दगडु विरकर, आसिफ शेख, रामदास बाबर, बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, महेश बनकर, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विभीषण सस्तुरे, वालचंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विजय तेळकीकर, पोलीस अंमलदार रविंद्र पाटमास, बापू मोहिते, गुलाब पाटील, शरद पोफळे, विक्रमसिंअ जाधव, अभिजीत कळसकर, गणेश बनकर  महिला पोलीस अंमलदार स्मिता गायकवाड, मेघा शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *