थेऊर (हवेलीनामा वृतसमूह ) माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष या माध्यमातून या कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले तसेच वेळेवर आर्थिक मदत मिळाल्याने आरोग्य अबाधित राहिले थेऊर येथील आरोग्यदूत म्हणून परिचित असणारे ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी या माध्यमातून हवेली तालुक्यातील नव्हे तर जिल्यातील अनेक रुग्णांना वेळेवर मदत मिळवून दिल्याने त्यांना नवजीवन मिळाले. याच आरोग्यदुताच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या रविवारी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच रक्तदान शिबिर आणि थेऊर येथे मंजूर झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन काकडेमळा प्राथमिक शाळेशेजारी करण्यात आले आहे.
या शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी, मोफत किडनी तपासणी, मोफत डोळ्यांची तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत स्त्रीरोग तपासणी, मोफत कान-नाक-घसा तपासणी, मोफत हाडांची तपासणी, मोफत दातांची तपासणी, मोफत औषधे वाटप करण्यात येणार आहे.
हृदय, किडनी, स्त्रीरोग, मोतीबिंदू आणि कान नाक घसा या शस्त्रक्रिया मोफत अथवा सवलतीच्या दरात केल्या जातील.तसेच रक्त दात्यास दहा लाखाचा अपघाती विमा देण्यात येणार आहे.
