थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) चिंतामणी गणपती मंदिरात गणेश कथा महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला .या सप्ताहाला २१वर्ष पूर्ण झाली आहेत.
अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर(ता.हवेली) चिंतामणी देवतेच्या जन्मसोहळ्या निमित्ताने संगीत श्री गणेश कथा महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळा येथील मंदीरात करण्यात आला माघ माहिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिथी भगवान चिंतामणीचा जन्माचा दिवस आहे चिंतामणी भगवंतांचा जन्मसोहळा गेली 21 वर्षापासुन थेऊर येथील चिंतामणीच्या मंदिरात भारतातील पहिल्या गणेश कथाकार ह.भ.प. रुक्मिणी महाराज तारु व संत चरित्र कथाकार चिंतामणी महाराज तारु या चिंतामणी विजय ग्रंथाचे पारायण करतात त्यामध्ये संगीत भजन, हरीपाठ झाला सांय(६ते८.३०)या वेळेत ह.भ.प.चिंतामणीमहाराज तारु यांनी चिंतामणी जन्म सोहळ्यावर कथन केले व चंद्रोदय नंतर पाळणा हलवुन चिंतामणी भगवंतांचा जन्म पाळणा गीत म्हणून साजरा केला यावेळी पंचकृषीतील नागरीक भाविक गर्दी केली होती गेली सात दिवसांपासून मंदीरात वैष्णवांचा मेळावा विणेकरी टाळकरी यांनी वातावरण मंगलमय झाले होते
चिंतामणीच्या पालखीने गावात ग्रामप्रदक्षिण पूर्ण केली यावेळी पंचकृषीतील दिंड्यानी या सोहळ्यात सहभाग घेतला त्यामुळे गावातील वातावरण या वैष्णवांच्या मेळ्यामुळे भक्ती रसात न्हाऊन निघाले होते टाळमुदुंगाच्या गजरात श्रीच्या पालखीने ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली यावेळी वारकर्यांनी फुगडीचा ठेका धरला हरीनामांचा गजर केला त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. सप्ताहाच्या सातव्या दिवशी काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.यावेळी चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त महादेव काकडे, हिरामण काकडे, विश्वस्त राजेंद्र उमाप,हभप एकनाथ तारु कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, मुंबई महापौर केसरी दत्तात्रय काळे, उद्योगजक लहू हरगुड़े, मल्हारी गावड़े, बाळासाहेब हरपळे पोपट कांचन रामदास गायकवाड़, कैलास लोणकर,स्वराज संघाचे ज्ञानोबा कुंजीर,हभप आनंद तांबे, महेश आगलावे,सचिन आगलावे थेऊर ग्रामस्थ महिला भजनी मंडळ व पंचकृषीतील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *