थेऊरःप्रतिनिधी राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस (एस एस सी) गुरुवार (दिं२१) फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून थेऊर(ता.हवेली) येथील चिंतामणी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे परिक्षा केंद्र असल्याने परिक्षेची पूर्व तयारी झाली असून या केंद्रात परिसरातील एकूण सहा शाळेंची 351 विद्यार्थी पैकी मराठी माध्यमचे 282 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत.अशी माहिती केंद्रप्रमुख व शाळेचे प्राचार्य राजाराम काकडे यांनी दिली प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात दहावीचे वर्षे महत्त्वाचे आहे यासाठी प्रत्येक जण तयारी करत असतो.त्यामुळे परिक्षा केंद्रावर वेगळाच उत्साह अनुभवास येत आहे. शाळेचे मुख्याध्यापक राजाराम काकडे, केंद्र संचालक महादू जढर, केंद्र समन्वयक जीवन शिंदे,परिक्षा विभाग प्रमुख इरफान पठाण, पोलिस अंमलदार सागर कदम शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीक्षार्थी विध्यार्थीचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.परिक्षा केंद्रावर लोणी काळभोर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. पालकांनी परीक्षा केंद्रावर आपल्या पाल्याला सोडवण्यासाठी गर्दी केली होती पहिलाच पेपर असल्याने परिक्षा केंद्रावर उत्साहाचे वातावरण होते.
