पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) महायुती सरकार मधील मंत्र्याला न्यायालयाचा दणका दोन वर्षांची शिक्षा पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. तब्बल तीस वर्षांपूर्वी दाखल केसमध्ये दोन वर्ष कारावास व पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्याचा भाऊ सुरेश कोकाटे यांना शिक्षा देण्यात आली.१९९५साली आमदार खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दृर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या सदनिका मिळवताना कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.या शिक्षेमुळे कोकटेंच्या आमदरकीवर टांगती तलवार आली आहे. या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
