मुंबई (हवेलीनामा वृतसमूह ) कुर्ला येथील गांधी बाल मंदिर हायस्कूलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘सन्मान गुरुजनांचा’ या सोहळ्यात ताराबाई मोडक अध्यापक विद्यालय माजी विद्यार्थी संघातर्फे होली क्रॉस हायस्कूल, कुर्ला या शाळेतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले व विद्यार्थिप्रिय शिक्षक दत्तात्रय महादेव पवार यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्री घैसास व प्रमुख पाहुणे हास्यजत्रा फेम जॉनी रावत व प्राचार्य विजय गायकवाड यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या गुरुजनांना देखील सन्मानीत करण्यात आले.
