पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लोणी काळभोर रामदारा परिसरात दोन दिवसांपूर्वीच लोणी काळभोर पोलिसांनी एका हातभट्टीवर धाड टाकली होती त्यानंतर पुन्हा याच परिसरामध्ये मोठा हातभट्टी उत्पादन करणारा मासा पोलिसांच्या गळाला लागला असून त्याच्याकडून तब्बल अकरा लाख साठ हजार रुपयांचा तयार तसेच कच्चामाल पोलिसांनी हस्तगत केला ही कार्यवाही लोणी काळभोर पोलीस तसेच गुन्हे शाखा युनिट सहा यांनी संयुक्तिक मध्यरात्री रामदरा परिसरात केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दि.१८/०२/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व स्टाफ असे कोंबिंग ऑपरेशन करत असताना मदन कांबळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ओढयाचे बाजुला रामदरा येथील मोकळा रानात मुकेश कर्णावत हा हातभट्टीची गावठी दारू तयार करत आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव व सहकारी यांच्यासह शोध घेतला असता मुकेश कर्णावत अंधाराचा फायदा घेवुन जंगलात पळून गेला.त्याठिकाणी १५०० लिटर तयार दारू १०० रु प्रति लिटर प्रमाणे एकूण १,५०,०००/-रू.ची तसेच २०,००० लिटर रसायन ५० रुपये प्रति लिटर प्रमाणे असे एकूण १०,००,०००/-रू.चे तसेच दारू करण्याचे साहित्य मोटार, ड्रम, एअर ब्लोअर, सरपण व इतर साहित्य असे एकुण ११,६०,०००/- रू.चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव, गुन्हे शाखा युनिट ६ कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलास अमंलदार बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे तसेच लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील पोलास अमंलदार सातपुते, वनवे, वीर, योगेश पाटील, शिरगिरे यांनी केली आहे.
