थेऊर -(हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर (ता.हवेली) येथील चव्हाण वस्ती येथे शाळेतील लहान विद्यार्थी यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात म्हसोबा मंदिर येथे साजरी केली. यावेळी चिमुकल्या शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने मंदीर परिसर दुमदुमला यावेळी सूरज नीतेश जाधव, रोशन नीतेश जाधव ,ओमकार सनी घाडगे,ओमकार सचिन चव्हाण,देवांश सोमनाथ जाधव,समर दीपक जाधव,सार्थक दीपक जाधव, हर्षद अमित चव्हाण, अथर्व अमित चव्हाण,
प्रज्वल दिलीप चव्हाण, निलेश गणेश घाडगे,
राजवीर राहुल शितोळे हे बाल शिवभक्त उपस्थित होते. यावेळी या चिमुकल्या शिवभक्तांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
