थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांवरील कारवाई करून अवैध धंदेवायकांचे कंबरडे मोडल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करण्याचा धडाका लावला असून यापुढे अशा आवाज करणाऱ्या बुलेट्स जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खरे तर बुलेट मध्ये अनेक गोष्टी बदलून महामार्गावर तसेच रस्त्यावर कर्णकर्कश्य आवाज करीत धावणाऱ्या वाहन चालकांवर प्रादेशिक परिवहन खात्याकडून कार्यवाही करण्याची अपेक्षा आहे परंतु याकडे लक्ष देण्यासाठी परिवहन खात्याकडे वेळच नाही की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे सोलापूर महामार्गांवर परिवहन खात्याची गस्त चालू असते, एवढेच नाही तर पुणे शहर वाहतूक शाखा चौकांमध्ये वाहनावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते त्यांच्या पण निदर्शनास ही गोष्ट येऊ नये ही एक आश्चर्याची गोष्ट आहे या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत यावर ठोस कारवाई अपेक्षित होती.
लोणी काळभोर चे पोलीस निरक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसापासून अवैध धंद्यावर कारवाई चा बडगा उगरल्यानंतर सर्वसमान्य नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मूळ गाडीमध्ये व सायलेंसर मध्ये बदल करून रस्त्यावर कर्णकरकष्य आवाज करत बुलेट पळवल्या जातात यावर परिणाम कारक कारवाई आवश्यक आहे. लोणी काळभोर पोलिसांकडून याला आळा घालण्यासाठी यापुढे प्रयत्न होणार आहेत.
