कुंजीरवाडी -(हवेलीनामा वृत्तसेवा ) लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कुंजीरवाडी मधील बारा फाटा येथे अवैधरित्या हातभट्टीची दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करून ७० लीटर तयार हातभट्टी गावठी दारू आणि एक दुचाकी  असा एकूण ५७००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत थेऊर पोलिस चौकीचे प्रशांत सुतार यांनी गुन्हा नोंद केला आहे.

          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गांवर कुंजीरवाडी गावच्या हद्दीत बाराफाटा येथे  रोहीत भागवत शिंदे (वय २० वर्षे, रा. जनता वसाहत पर्वती पुणे ) आणि महादेव अंनता पवार (वय २६ वर्षे) हे ऍक्टिवा मोटार सायकल एम एच १२- ०००२ वर गावठी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भागात गस्तीवर असलेले पोलीस हवालदार निलेश कोल्हे विजय जाधव, चंद्रकांत माने विशाल बनकर आणि पोलिस शिपाई प्रशांत सुतार यांनी तात्काळ त्या बातमीच्या अनुषंगाने कारवाई करत  संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना थांबवून  त्यांच्या कडे चौकशी केली असता  दोन प्लॅस्टिक कॅन्डमध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू अंदाजे ७० लिटर व मोटार सायकल असा एकून ५७००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
           ही कामगिरी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके,पोलीस हवालदार निलेश कोल्हे विजय जाधव, चंद्रकांत माने विशाल बनकर,प्रशांत सुतार यांनी केली असून पुढील तपास विजय जाधव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *