लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटण करण्यासाठी पोलिसांकडून जोरदार मोहीम चालवली जात असून गेल्या काही दिवसापासून कारवाईत सातत्याने वाढ होत आहे. यात प्रामुख्याने मटका जुगार अवैध दारू विक्री यावर सातत्याने कारवाई चालू आहे. आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रामदारा परिसरात अवैध दारू भट्टीवर धाड टाकून २,३०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

कोळपेवस्ती जवळ कॅनॉलच्या कडेला असलेल्या पाटबंधारे खात्याच्या जागेत संदीप बादशहा राजपुत रा. वाडेबोल्हाई ता. हवेली जि. पुणे आणि बनफुल बादशहा राजपुत रा. कोळपेवस्ती, रामदरा रोड, लोणीकाळभोर ता. हवेली जि. पुणे हे दोघे गावठी हातभट्टी दारु तयार करीत असल्याचे समजल्याने त्याठिकाणी पोलीसांनी धाड टाकली. त्यात बनफुल बादशहा राजपुत यास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेकडुन २,३०,०००/- रुपये किंमतीचा हातभट्टी दारु तयार करण्याचे रसायण व दारु विक्रीचे वाहन दुचाकी मोपेड हिरो डयुट गाडी जप्त केली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस हवालदार नागलोत, विर, पोलीस शिपाई पाटील, कुदळे, मंगेश नानापुरे, धुमाळ, तेलंग यांनी केली.

अवैध धंद्यावरील सातत्यपूर्ण कारवायांमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात या कारवाया अधिक प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *