थेऊर (हवेलीनामा वृतसमूह ) इतिहास काळापासूनच यात्रांचे महत्त्व अनन्य साधारण असून या यात्रांमधील तरुणांचे आकर्षण म्हणजे कुस्त्यांचा जंगी आखाडा, सध्या गावोगावी यात्रांचा हंगाम चालू झाला असून पूर्व हवेलीतील पेठ गाव या ठिकाणी कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला या आखाड्याचे वैशिष्ट्य ठरले म्हणजे येथे तब्बल तीन महाराष्ट्र केसरी एक हरियाणा केसरी व उपमहाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रीय पैलवानांनी हा आखाडा गाजवला.
ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ केसरी मानाच्या गदेसाठी हरियाणा केसरी,नॅशनल चॅम्पियन भुपेंद्र सिंग आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यात एक लाख आकरा हजार एकशे अकरा रूपयांची लढत झाली यात पृथ्वीराज पाटील याने भुपेंद्र सिंग याच्यावर विजय मिळवत मैदान मारले.ही कुस्ती व ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ केसरी मानाची गदा युवा उद्योजक सुजित चौधरी व मित्र परिवार यांनी पुरस्कृत केली होती.
एक लाख आकरा हजार एकशे अकरा रूपये बक्षीस साठी शेवटच्या दोन कुस्त्या झाल्या.महाराष्ट्र केसरी बाळा रफिक शेख विरूद्ध हर्षवर्धन सदगीर या लढतीत रफिक शेख विजयी झाला.
यावेळी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके,दिलीप वाल्हेकर, गुलाब आबा चौधरी,दादा सातव, उरूळी कांचनचे पोलिस उपनिरीक्षक कांबळे,पोलिस पाटील दत्तात्रय चौधरी, माजी सरपंच सुरज चौधरी,बाप्पुसाहेब चौधरी, राजेंद्र आढाव,बाबुराव गायकवाड,काळुराम चौधरी,सोमनाथ चौधरी, राजेंद्र चौधरी,दिपक चौधरी, निखील चौधरी,रघुनाथ चौधरी, गणेश गायकवाड, आकाश आढाव, संजय नाना चौधरी, सुजित हाके, राकेश चौधरी, प्रतिक चौधरी,श्रीकांत चौधरी, मारुती चौधरी,पै.उपसरपंच निलेश खटाटे,सुहास खुटवट यांनी पंच म्हणून काम पहिलं यावेळी पेठ, नायगाव, सोरतापवाडी येथील कुस्ती शौकीन यांनी कुस्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
आमदार माऊली कटके यांनी आयोजकांचे कौतुक करून भविष्यात कुस्त्या साठी भरीव सहकार्य करू असे सांगितलं.
