थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीत यात्राचा हंगाम चालू झाला असून नायगाव येथील यात्रेची सांगता कुस्त्याच्या जंगी आखाड्याने झाली.डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे व हिंदकेसरी पैलवान भोला पंजाबी यांच्यामध्ये शेवटची कुस्ती झाली यात शिवराज राक्षे याने पैलवान भोला पंजाबी यास असमान दाखवत कुस्ती चितपट केली नायगावच्या यात्रा इतिहासात पहिल्यांदा कुस्ती चितपट झाली आणि शिवराज राक्षे हा श्री काळभैरवनाथ केसरी गदेचा मानकरी ठरला.
नायगाव येथील पीरसाहेब यात्रा नुकतीच पर पडली.यात संदल कार्यक्रम, ढोल लेझीम छबिना कार्यक्रम आणि राष्ट्रपती पदक विजेते मंगला बनसोडे सह नितीन बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम सलग तीन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
नायगाव यात्रा कमिटी , नायगाव ग्रामपंचायत वस्तूरूप देणगीदारांच्या मदतीने नवीन आखाड्याचे बांधकाम करण्यात आले त्याचे उद्घाटन सरपंच उपसरपंच व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आखाड्यासाठी मदत करणारे देणगीदार विलास सोनबा चौधरी, संदीप सुभाष हगवणे, राहुल युवराज चौधरी, नंदकुमार दत्तात्रय चौधरी, बापू बबन चौधरी, जालिंदर कटके, संजय कामठे, जालिंदर शिर्के यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याच आखाड्यात कुस्त्यांचे मैदान पर पडले.
आखाड्यामध्ये एकूण 45 कुस्त्या लावण्यात आल्या, शेवटची निकाली कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे व हिंदकेसरी पैलवान भोला पंजाबी यांच्यामध्ये झाली. यात राक्षे याने विजय मिळवला. श्री काळभैरवनाथ केसरी नायगाव हवेली गदा व रुपये 2,22,222/- इतका इनाम देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच कल्याणी हगवणे, उपसरपंच दत्तात्रय बारवकर , संचालक विजय चौधरी, मा. सरपंच राजेंद्र चौधरी, तंटामुक्त अध्यक्ष बापुसाहेब चौधरी, चेरमन विकास चौधरी, कृष्णा चौधरी, गणेश गुलाब चौधरी, जितेंद्र पांडुरंग चौधरी, संगीता शेलार, आरती चौधरी, पल्लवी गायकवाड, उतम शेलार, बाळासाहेब गायकवाड , प्रियंका गायकवाड , यात्रा कमिटी अध्यक्ष विजय चौधरी, उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, खजिनदार संजय चौधरी, सचिव सुनील हगवणे ,महाराष्ट्र केसरी अक्षय गरुड, पै बिराजदार, सुरेश हगवणे,शिवाजी चौधरी, माया चौधरी, कल्पना पवार, मनिषा माने, पोलीस पाटील अर्जुन पवार , दत्तात्रय चौधरी, रामचंद्र पवार ,संतोष हगवणे, विठ्ठल चौधरी, ज्ञानोबा शेलार, पोपट चौधरी ,उत्तम घुले,योगेश चौधरी ,नितीन हगवणे, अमोल चौधरी, डॉ. हेमंत चौधरी, रामचंद्र माने , विजय चौधरी ,अर्जुन चौधरी , विठ्ठल हगवणे , नामदेव चौधरी,गुलाब चौधरी, किरण गुळुंजकर , कैलास चौधरी,भाऊसाहेब चौधरी ,संजय कामठे,किरण चौधरी, अविनाश चौधरी,युसुफ शेख , शांताराम उरसळ , गोरख चौधरी, मुकिंदा गुळुंजकर, दत्तात्रय चौधरी, राजेंद्र शेलार, दत्तात्रय हगवणे, अर्जुन चौधरी, नंदू चौधरी, , पोपट हगवणे , दत्तात्रय गुळूंजकर , नितीन गरुड, मिलिंद शेलार आदी उपस्थित होते.
