थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील बेटवस्ती या ठिकाणी पुन्हा एकदा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून सात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील चार व्यक्ती फरार असल्याचे माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिनाभरापासून पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये चालू असणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाईचे धाडसत्र चालू असून वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालण्यात आल्या यामुळे अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मोडण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश येत असले तरीही पुन्हा त्याच जागेवर अवैध धंदे चालू होत असल्याचेही दिसून येत आहे कारण या अगोदर देखील बेटवस्ती येथील अवैध धंद्यावर कारवाई करून तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी काल शनिवारी रात्री जुगार अड्ड्यावर धाड घालण्यात आली यात तीन जण ताब्यात घेतले असून चार जण फरार असल्याची माहिती मिळत आहे.

या कारवाईमध्ये किरण शेलार, नदीम मुलानी व सागर राजगुरू यांना अटक करण्यात आली असून प्रकाश पवार, माऊली उर्फ ज्ञानेश्वर राखपसरे, जुगल किशोर लड्डा आणि रोहित भारत हे पसार झाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *