पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लोणी कळभोर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार ललीता सिताराम कानवडे यांनी उल्लेखनिय न्यायालयीन कामगिरी केल्या बद्दल त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरंग कार्यक्रमात सन्मान केला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या ललीता सिताराम कानवडे पोलीस ठाणेकडील सेसन केसेस संदर्भात दोषारोप सिद्ध करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय येथे पैरवी म्हणून काम पार पाडतात. पोलीस ठाणेकडील खुन, आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंडाबळी यांसारख्या अतिशय गंभिर स्वरुपाचे सेशन केसेस मधील फिर्यादी, साक्षीदार, मुद्देमाल व सर्व साक्षीपुरावे विहीत वेळेत योजनाबध्द पद्धतीने न्यायालयास सादर केले. तसेच सरकारी अभियोक्ता यांना सदर केसेसचे अनुषंगाने सर्वतोपरी सहकार्य केले. त्यांनी त्यांचे कर्तव्य प्रभाविरित्या पार पाडल्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील सेशन केसेस पैकी सन २०२५ मध्ये एकुण ४ गंभिर गुन्हयांमध्ये दोषारोप सिद्ध झाले आहे.

यातील ४ गुन्हयांपैकी ३ गुन्हे खुन व एक गुन्हा हुंडाबळी या सदराखालील आहे. खुनाचे २ गुन्हयातील आरोपीना जन्मठेपे व द्रव्यदंड असे शिक्षा व खुनाचे एका गुन्हयातील आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावास व द्रव्यदंड शिक्षा देण्यात आली आहे . त्याचप्रमाणे हुंडाबळीचे गुन्हयातील आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावास व द्रव्यदंड शिक्षा देण्यात आली आहे.

याप्रमाणे ललीता कानवडे यांनी अतिशय उत्कृष्ठ, उल्लेखनिय व गौरवास्पद कामगिरी केलेली आहे. त्यामुळे पुणे शहराचे दोषसिध्दीचे प्रमाणात वाढ होवुन पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यात त्यांची कामगिरी मोलाची ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *