शिरूर (हवेलीनामा ऑनलाइन) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिरूर तालुका उपाध्यक्षपदी टाकळी हाजीचे पत्रकार योगेश भाकरे यांची निवड करण्यात आली.शिरूर येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शिरूर तालुका संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे, तालुका अध्यक्ष जालिंदर आदक, सचिव अर्जुन बढे, उपाध्यक्ष सुनील पिंगळे, उपाध्यक्ष भाऊसाहेब खपके,शहराध्यक्ष किरण चौधरी,सदस्य बबनराव वाघमारे,सुर्यकांत शिर्के,आकाश भोरडे, शिव व्याख्याते आकाश वडघुले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.पत्रकार संघ वाढीसाठी चर्चा करुन तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या यावेळी जाणुन घेण्यात आल्या.
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे,राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे,पुणे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे व शिरूर तालुका संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी हाजीचे पत्रकार योगेश भाकरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे तालुका अध्यक्ष जालिंदर आदक यांनी सांगितले.
