robber with a goldsmith
        पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  घरफोडी करून लूटमार करणाऱ्या सराईतासह चोरीचा माल विकत घेणाऱ्या सोनारास लोणी काळभोर पोलिसांनी घातल्या बेड्या त्यांच्याकडून रु ३ लाख ४० हजाराचे ६८ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.
        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत वडकी गाव परिसरात ऑगस्टमध्ये किरण महादेव सोनवणे यांचा घरी कोणी नाही याचा फायदा घेऊन कडी कोयडा तोडून घरातील ४६ ग्रॅम वजनाचे दागिने व मोबाईल चोरून नेला तसेच याच परिसरातुन युवराज नागवडे घराला कुलूप लावून मूळ गावी गेले असता त्याची कडी उचकटून ५० ग्रॅम वजनाचे दागिने पळवले होते.
         याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर व पोलीस अंमलदार यांना सूचना केल्या यावर विशेष पथक तयार करून तपास चालू केला असता पथकातील सुनील गायकवाड व नागलोत यांना एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की,ही घरफोडी आटपाडी येथील सराईत गुन्हेगार शाहरुख विजय पवार याने केली आहे याची माहिती वरिष्ठांना देऊन शाहरूख पवार यास दि २१ सप्टेंबर रोजी लोणी काळभोर परिसरातून सापळा रचून पकडले.यावर अधिक तपास केला असता त्याने ही घरफोडी त्याचा भाऊ देवगण विजय पवार व साडू तात्या वसंत शिंदे या यांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले.चोरलेले सर्व दागिने आटपाडी येथील प्रकाश रावसाहेब काकडे या सोनारास विकल्याचे सांगितले.त्यानुसार त्या सोनारास त्याब्यात घेऊन त्याच्याकडून रु ३ लाख ४० हजाराचे ६८ ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिने हस्तगत केले.
        ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर,पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत, अमित साळुंखे,श्रीनाथ जाधव, संभाजी देवकर, पोलीस शिपाई बाजीराव वीर,निखिल पवार, शैलेश कुदळे,राजेश दराडे,दिगंबर साळुंखे या पथकाने केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *