वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा ) वाघोली पोलिसांची कोयता गँग टोळीचा म्होरक्यावर ओम म्हस्के वर एम पी. डी.ए. अंतर्गत कारवाई करुन एक वर्षांसाठी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार ओम दादाराव म्हस्के (वय १९ वर्षे, रा. दुबेनगर लेन नं. १३ गुरुदत्त सोसा. वाघोली ता. हवेली जि. पुणे) यास पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबध्द आदेश काढल्याने आरोपीची छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षासाठी रवानगी करण्यात आली आहे.
वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील दुबेनगर, बी.जी.एस. फाटा व वाघोली बाजारतळ तसेच आसपासच्या भागात कोयत्याचे साहाय्याने दहशत माजवुन कायम लोकांना दहशतीखाली ठेवुन त्यांना वारंवार त्रास देणाऱ्या इसमामुळे या परिसरातील रहिवाशी दडपणाखाली वावरत होते त्यामुळे वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु लागल्याने म्हस्के वर वाघोली पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई होण्याबाबत पोलीस आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाईचा आदेश काढून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. यापुढे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत कोयत्याचे सहायाने किंवा सोशल मिडीयाचा वापर करुन दहशत निर्माण करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेऊन अशा प्रकारच्या कारवाईंची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे माहिती वाघोली पोलिसांनी दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त हिंमत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार, पोलीस उपनिरीक्षक दर्शन देवगुडे, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, पोलीस हवालदार प्रशांत कर्णवर, प्रदिप मोटे पोलीस अंमलदार सागर कडू, कमलेश शिंदे, गणेश आव्हाळे, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, प्रतिम वाघ, गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे.
