पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) जेलमधून सुटल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातून दुचाकी चोरुन ओळखीच्या गॅरेजवाल्याच्या मदतीने वाहन विक्री करणारा सराईत पुणे पोलीसांकडून गजाआड करुन त्याच्याकडून तब्बल 25 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीच्या घटनेत वाढ झालेली होती त्यावर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त, निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर वित्ते हे करीत असताना गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळाले सीसीटिव्ही फुटेजवरून गुन्हयातील मोटर सायकल चोरणारा आरोपी हा शंकर भरत देवकुळे वय ३२ वर्षे, रा. मेमाने वस्ती, उरूळी देवाची हा पोलीस सराईत मोटरसायकल चोर असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून त्यास इचलकरंजी, कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने मागिल ०५ महिन्यांचे कालावधीत जेलमधून सुटल्यानंतर पुणे शहर परीसरातुन दुचाकी वाहने चोरी करून गाडयांच्या नंबरप्लेट काढून टाकून ओळखीचा गॅरेज मालक अनिकेत सुनिल कुदळे, वय २७ वर्षे, रा.मु.पो. खडकी, ता. दौंड, जि. पुणे यास त्याचे भैरवनाथ गॅरेज मु.पो. खडकी, ता. दौंड, जि. पुणे येथे विक्री करीता देत होता तसेच शंकर देवकुळे याचा तुळजापुर येथील मित्र याचेकडे ठेवण्याकरीता दिलेल्या ०२ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच शंकर देवकुळे याचे ओळखीच्या व्यक्तीस विकलेली ०१ दुचाकी व त्याचेकडे विक्रीकरीता ठेवलेल्या ०४ दुचाकी जप्त केल्या आहेत. एकुण २५ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. वाहनांबाबत पुणे शहरात व इतर ठिकाणी वाहने चोरीचे एकुण १८ गुन्हे नोंद असून उर्वतरी ०७ वाहनांचे मालकांचा शोध सुरू आहे.

शंकर भरत देवकुळे याने मेट्रो स्टेशन जवळ व सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या ज्या गाड्यांचे लॉक जुने झाले आहे अशा दुचाकी हेरून डुप्लीकेट चावी वापरून त्या चोरी करून घेवून जात होता. तसेच शंकर देवकुळे हा गॅरेज मालक अनिकेत कुदळे याला सांगत होता की, “मी फायनान्स कंपनीत कामाला असून हप्ते न भरलेल्या गाड्या ओढून आणतो.” त्याप्रमाणे अनिकेत याला विक्री करण्यासाठी देत होता. अनिकेत हा कागदपत्राबाबत व मालकीबाबत कोणतीही खात्री न करता शंकर देवकुळे यास साथ देवून त्या दुचाकी वाहनांचे चेसीस नंबर व इंजिन नंबर ग्राईंडरने खराब करून त्या दुचाकी गावामधील शेतक-यांना व गरजुंना कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकत होता.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी, रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, सहाय्यक पोलीस फौजदार मधुकर तुपसौंदर, पोलीस अंमलदार शरद वाकसे, संजिव कळंबे, सुजित पवार, विनोद भंडलकर, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, महेंद्र तुपसौंदर, उदय राक्षे, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री वाघमारे, शुभांगी म्हाळसेकर यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *