थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरडे येथे घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन मास्टर बेडरूम मधील फरशी खाली असलेल्या तिजोरीतील चौदा लाखाचे मौल्यवान वस्तू चोरुन नेल्या संदर्भातील झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात लोणी-काळभोर पोलीसांना यश आले असून यात घरफोडी करणारा सराईत गजाआड करुन त्याच्याकडून चोरीस गेलेला साडे नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०७/०२/२०२५ रोजी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्हयाच्या अनुषंगाने गस्तीवर असताना तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव यांना माहिती मिळाली की, संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी, वय ४५ वर्षे, रा. थेऊर रस्ता, वृंदावन पॅलेस मंगल कार्यालयाशेजारी, थेऊर कोलवडी रोड, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे यास वृंदावन पॅलेस मंगल कार्यालयाशेजारुन ताब्यात घेवून अटक करुन पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेले ९५.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व एक किलो वजनाची चांदीची वीट असा एकुण ९,५०,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.सखोल चौकशी दरम्यान चोरीचे एकुण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत

ही कामगीरी सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, अनुराधा उदमले,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, संभाजी देविकर, विलास शिंदे, सुनिल नागलोत, पोलीस अंमलदार बाजीराव बीर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रदिप गाडे, मंगेश नानापुरे, चक्रधर शिरगीरे यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *