थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे आयुक्तालयातील पूर्व हवेलीतील लोणी-काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर सडेतोड कारवाई करण्यात लोणी-काळभोर पोलीसांकडून जोरकस प्रयत्न होत असून गेल्या काही दिवसांत यात सातत्या दिसून येत आहे.पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीक्षेत्र थेऊर हे अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र येथे मात्र ही कारवाई झालेली नव्हती परंतू काल गुरुवार रोजी येथील मटका जुगारावर कारवाई करत सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

थेऊर येथील कारवाईत मटका चालक अभिजित दत्तात्रय गायकवाड याचे मटका जुगार अड्डयावर धाड टाकून त्याच्याकडून मटका जुगार साहित्यासह 21 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.तसेच अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मटक्यावर कारवाई झाल्यानंतर पुन्हा हा धंदा पूर्ववत चालू होतो,त्यासाठी पोलीस प्रशासनाने याकडे अधिक लक्ष ठेवणे अपेक्षित असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे,अनेक तरुण यात गुरफटले आहे तर बरेच जण दिवसभर आकडेमोडीत गुंतलेले असल्याचे दिसून येते.

लोणी-काळभोर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचा चंग बांधला आहे.भविष्यात ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मटक्यावरील कारवाई नंतर गुटख्यावर कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.सर्रासपणे गुटखा उपलब्ध होतो आहे.

अवैध धंदे अनेकदा गुन्हेगारीला कारणीभूत ठरतात त्यामुळे भविष्यात हे धंदे पुन्हा चालू होणार नाहीत याबद्दल अपेक्षा आहे.

ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचेसह सहकारी पोलीस हवालदार नागलोत, पोलीस शिपाई कुदळे,पाटील सोनवणे,धुमाळ आणि गळाकटे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *