पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पूर्व हवेलीतील वाडेबोल्हाई- बिवरी शिवेवरील हातभट्टी गुन्हे शाखेच्या युनिट कडून उध्वस्त करण्यात आली.

        दिनांक 12/02/2025 रोजी युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधक गस्तीवर असताना ऋषीकेश व्यवहारे व ऋषीकेश ताकवणे यांना माहिती मिळाली की, वाडेबोल्हाई- बिवरी शिवेवर नदी किनारी पथरसिंग नाथा राजपूत रा. वाडेगाव, ता. हवेली, जि. पुणे हा भट्टी लावून दारू काढत आहे.त्यावर त्या ठिकाणी धाड टाकून 9,800 लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य व 70 लीटर तयार दारू असा एकूण 3,55,000/-रू किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

         लोणीकंद पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे . 

          ही कामगिरी पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 राजेंद्र मुळीक, प्रभारी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यूनिट -६ वाहिद पठाण, सहा पोलीस निरीक्षक मदन कांबळे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *