पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) चारित्र्याच्या संशय घेऊन पत्नी आणि अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने मानेवर वार केले यात मुलाचा मृत्यु झाला यावेळी तक्रारदार यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला करून आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला सन 2019 मध्ये घडलेल्या घटनेत आरोपीस सत्र न्यायालयाने सश्रम कारावासासह जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
दि.13 जुन 2019 रोजी लोणी-काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पठारेवस्ती येथे आरोपी योगेश परसराम बसेरे याने आपल्या पत्नीवर चारित्र्य संशय घेऊन तिला माहेरी येऊन भेटण्याच्या बहाण्याने तिच्यासह मुलाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले यावेळी तक्रारदार सोडविण्यास गेले असता त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला यात अल्पवयीन मुलगा मृत्युमुखी पडला याबाबत चा गुन्हा लोणी-काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.
लोणी-काळभोर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांनी याचा सखोल तपास करुन सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.त्यानंतर न्यायालयात आरोप निश्चित करून आरोपी योगेश बसेरे यास सश्रम कारावासासह जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी-काळभोर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आल्पावधीतच पाच गुन्हे निकाली निघून यात गुन्हेगारास शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील नामदेव तरळगट्टी, कोर्ट पैरवी श्रीमती ललिता कानवडे, यांनी कामकाज पाहिले.या कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी ललिता कानवडे व गुन्हयाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.
