मुळशी – (हवेलीनामा वृत्तसेवा) मुळशी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाच्या अध्यक्षपदी मारुंजी येथील समीर बुचडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद सिंह गोतरणे उपस्थित होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात मुळशी तालुक्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असून पक्षाची ध्येय धोरण तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना बळकट करणार तसेच गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(शरद पवार) बूथ कमिट्यांच्या माध्यमातून युवकांचे संघटन मजबूत करणार असल्याचे बुचडे यांनी हवेलीनामाशी बोलताना सांगितले त्यांच्या या निवडीचे परिसरात स्वागत करण्यात येत आहे.
