पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा ) दोन सराईत गुन्हेगारांना देशी कट्टासह घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयांची उकल करुन तब्बल १२,१७,४००(बारा लाख सतरा हजार चारशे) रुपयांचा हस्तगत केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकातील पोलिस हवालदार नितीन मुंडे यांना बातमीदारा कडून माहिती मिळली सय्यदनगर येथे एक इसम देशी बनावटीचे शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली असता आरोपी समीर उर्फ कमांडो हनीफ शेख, (वय १९ वर्षे, रा. गल्ली नं.२३, सय्यदनगर, हडपसर, पुणे) यास गंगा नगर, फुरसुंगी येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, २ जिवंत काडतुसे, घरफोडीचे साहित्य आणि चोरी केलेल्या दोन मोटर सायकल हस्तगत केल्या.
आरोपीकडे अधिकची चौकशी केली असता त्याने कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याचे तसेच लोणी काळभोर व हडपसर येथे चोरी केल्याचे कबूल केले. शेख यास अग्निशस्त्र व काडतुसे पुरवणारा सराईत यश मुकेश शेलार, (वय २० वर्षे, रा. तरडे वस्ती, महंमदवाडी, पुणे) यास अटक करण्यात आली असुन त्याचेकडुन एक देशी कट्टा हस्तगत करण्यात आला.असा एकूण
१२,१७,४००/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त विवेक मासाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलिस हवालदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली.
