पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे नाशिक महामार्गावर ढाबे व पेट्रोलपंप भागात थांबणाऱ्या गाडयांची पाठीमागील बाजुने ताडपत्री फाडून गाडीतील मुद्देमाल चोरून नेणारी परराज्यातील चोरांची टोळी आळेफाटा पोलीसांनी गजाआड केली असून त्यात गोध्रा हत्याकांडातील जन्मठेप शिक्षा भोगत असलेल्या सध्या पॅरोल वर बाहेर असलेल्या गुन्हेगाराचा देखील समावेश असल्याची माहिती पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.त्यांच्याकडून १४.४०,८७८/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.०७/०१/२०२५ रोजी मध्यरात्रीनंतर आळेफाटा पोलीस स्टेशन ह‌द्दीत आणे गावच्या शिवारात इंडीयन ऑईल पेट्रोलपंपाचे आतील मोकळे जागेत टेम्पो ड्रायव्हर सोमनाथ नारायण गायकवाड भिवंडी येथील जे के टायर्स अॅन्ड इंडस्ट्रील लि. शक्ती लॉजीस्टीक पार्क भिवंडी महाराष्ट्र कंपनीचे गोडावून मधून १६५ टायर घेवून सोलापुर कडे जात असताना झोप आल्याने गाडी रस्त्याचे कडेला लावून झोप घेतली. दरम्यान ताडपत्री फाडून २,४९,६२२/- रू किंमतीचे २२ टायर चोरून नेल्या बाबत आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचा तपास करताना मंचर पोलीस स्टेशन व सिन्नर पोलीस स्टेशन, नाशिक येथे ढाबे व पेट्रोलपंप भागात थांबणाऱ्या गाडयांची पाठीमागील बाजुने ताडपत्री फाडून गाडीतील मुद्देमाल चोरून नेल्याबाबत गुन्हे दाखल होते. सर्व गुन्हयांची गुन्हा करण्याची पध्दत ही एकाच प्रकारची असल्याने गुन्हयांचा अभ्यास करून अशाप्रकारचे गुन्हे करणारी टोळी ही गुजरात राज्यातील गोधरा या ठिकाणची असल्याची माहिती मिळाली. गुन्हा हा आयशर टेम्पो कमांक GJ 14 X 8853 याच्या सहाय्याने केल्याचे निष्पन्न झाले. आयशर टेम्पो कमांक GJ 14 X 8853 हाचा शोध घेवून चांदवड जि.नाशिक येथून 1)सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा वय ५५ वर्षे, २) साहील हनीफ पठाण वय २१ वर्षे, ३) सुफीयान सिकंदर चंदकी वय २३ वर्षे, ४) आयुब इसाग सुनठीया वय २९ वर्षे, ५) इरफान अब्दुलहामीद दुरवेश वय ४१ वर्षे रा. गोध्रापंचमहाल ता. गोध्रा जि. पंचमहाल गुजरात यांना ताब्यात घेऊन चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून एकूण रु १४,४०,८७८/-किमतीचा चोरीस गेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हयातील मुख्य आरोपी सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा हा गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून त्यांस आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून तो शिक्षा भोगत असताना रजेवर असताना ती परत कारागृहात हजर न होता टोळी बनवून चोरीचे गुन्हे करत असून त्याच्यावर गुजरातमधील बारा महाराष्ट्रातील तीन व राजस्थानात एक गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण),रमेश चोपडे. अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, रविंद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे, पोलीस.हवालदार विकास गोसावी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, आमित पोळ, पोलीस शिपाई अमित माळुंजे, नविन अरगडे, सचिन रहाणे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *