कदमवाकवस्ती (हवेलीनामा ऑनलाइन)   महिलांवरील दिवसेंदिवस वाढत चालले अन्याय, अत्याचार व बलत्कारासारख्या भयंकर घटना ही गंभीर बाब असुन,अशा प्रकारचे सर्व खटले सरकारने जलदगती न्यायालयामध्ये चालवून पिडितेला लवकरात लवकर न्याय देण्याची व्यवस्था करावी. अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी राजमाता अहिल्यादेवी होळकर ब्रिगेड व मावळा ग्रुपच्या वतीने हडपसर येथील गांधी चौकात आंदोलन करण्यात आले.त्यावेळी रेश्मा हाके यांनी मागणी केली.
           आंदोलनात रेश्मा हाके, घनश्याम हाके, सुफीयन शेख ,गौस शेख ,तुषार आरने, कुमार चक्रे ,दीपक वाघमारे ,किसन कोळपे ,गणेश गोरे ,संतोष अनुष्का हाके बिचुकले, विठ्ठल मदने ,अंजुम शेख, नेहा राजपूत, मनीषा जाधव ,हेमलता सरकार, मनीषा लोंढे, पल्लवी गायकवाड ,रजनी राठोड, अश्विनी हांडे भाग्यश्री म्हस्के. व महिला -पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
         सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरातील  हडपसर,वानवडी, पिंपरीचिंचवड तसेच औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबईतील मुली महिलांवरील अत्याचाराच्या घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांना मुलींच्या सुरक्षेची चिंता सतावत आहे. घडलेल्या घटनांबाबत सरकारने गंभीर दखल घेऊन  दोषींवर जलद कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत  व सुरक्षेचे वातावरण निर्माण करावे, अशी मागणी हाके यांनी आंदोलनात केली. हे आंदोलन राजमाता अहिल्यादेवी ब्रिगेड व मावळा ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते.पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *