पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) फुरसुंगीतील गंगानगर येथील विवाहितेस लग्नात योग्य मानपान दिला नाही तसेच फ्लॅटसाठी माहेरहून पैसे आणत नाही म्हणून शारीरिक व मानसिक छळवाद केला आणि वारंवार टोमणे देत राहिल्याने हा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने मार्च 2012 मध्ये अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेऊन आत्महत्या केली,याप्रकरणात तिच्या पतीसह सासू,सासरा, ननंदेसह दिर यांच्याविरुद्ध लोणी-काळभोर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याचा निकाल नुकताच लागला यात पतिस सात वर्षे तर सासरा व सासू यांना तिन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या घटनेत सततच्या होणाया छळाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन अंजना नवनाथ ताकमोगे, वय २० वर्षे, हिने आत्महत्या केली यासाठी १) नवनाथ पांडुरंग ताकमोगे (पती), वय ४४ वर्षे रा. सर्व्हे नं. २१५/५अ/२, गंगानगर, मौजे फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे २) दिनेश पांडुरंग ताकमोगे (दिर), ३) पाडुरंग भानुदास ताकमोगे, (सासरे), वय ६९ रा. सदर ४) रुक्मीणी पांडुरंग ताकमोगे (सासू) वय ६४ ५) मेधा उर्फ सोनल पाडुरंग ताकमोगे (नणंद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. शिक्षावरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दिनांक ०३/०२/२०२५ रोजी आरोपी १) नवनाथ पांडुरंग ताकमोगे वय ४४ वर्षे यास ७ वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना पंधरा दिवस साधा कारावास व २) पांडुरंग भानुदास ताकमोगे वय ६९ ३) रुक्मीणी पांडुरंग ताकमोगे वय ६४ यांना ३ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
ही कामगिरी सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील प्रदिप गेहलोत, कोर्ट पैरवी श्रीमती ललिता कानवडे, यांनी कामकाज पाहिले. या कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार ललिता कानवडे व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना ५ हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.
