पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) लोणी-काळभोर आणि लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करून चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.

युनिट ६ चे पथक वाघोली पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्तीवर असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार डी. मार्ट जवळ, लोहगाव वाघोली रोड येथे उभा असल्याचे समजले.तेथे पथकासह जाऊन राहुल दगडू शिंदे, वय ३२ वर्षे, रा. पिंरगुट, पुणे संशयितरीत्या मोटार सायकलवर उभा असताना त्यास ताब्यात घेतले. मोटारसायकल बद्दल चौकशीत तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देऊन लागला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या वर्णनाचे एकूण ८७ ग्रॅम सोन्याचे दागिने, रु. ०६,४०,३२२/-किमतीचे दागीने मिळून आले. तसेच त्याच्याकडील मोटारसायकल बाबत चौकशी केली असता ती देखील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

अधिक चौकशीत त्याने सोन्याचे दागिने हे लोणीकंद व लोणी काळभोर पोलिस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच मोटारसायकल ही रावेत पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे उघड झाले आहे.

ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२ राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा, युनिट ६ प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलिस निरिक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे गणेश डोंगरे, नितीन धाडगे, प्रतिक्षा पानसरे, चालक पो. अंमलदार सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *