पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) आपल्या सुनेवर वाईट नजर ठेवत असल्याने मुलानेच आपल्या वडिलांना अकरा वर्षापूर्वी ऊस तोडण्याच्या कोयत्याने ठार मारले त्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळीकांचन चौकी अंतर्गत असलेल्या उरुळीकांचन येथील सचिन अंबादास खोत याने दि. २९/१०/२०१४ रोजी त्याचे वडील अंबादास दिगांबर खोत वय ५२ वर्षे यांचा लोखंडी कोयत्याने खुन केला होता.मयत हे गुन्हेगाराचे

वडील असुन त्यांची सुनेवर वाईट नजर होती, ते नेहमी आरोपीचे पत्नी समोर फिरायचे व तीचा हात धरुन तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करायचे. दि. २९/१०/२०१४ रोजी अंबादास खोत हे जेवण करत असाताना आरोपी त्याचे वडीलांना आपण रात्री शेतात पाणी द्यायला जावु असे म्हणाला. त्यावर त्याचे वडील अंबदास खोत म्हणाले तु शेतात पाणी द्यायला जा मी घरीच थांबतो. त्यांचे बोलण्याचा राग आल्याने आरोपीने उस तोडण्याचे लोखंडी कोयत्याने अंबादास खोत यांचा खुन केला. त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या गुन्हयाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजितसिंग यांनी सखोल तपास करुन सबळ पुराव्याअंती आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. पी. जाधव यांनी तक्रारीची सुनावणी घेतली. सुनावणी दरम्यान अतिरीक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी सरकार पक्षातर्फे बाजु मांडली.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलीसउप आयुक्त, परिमंडळ ०५. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे महिला पोलीस अंमलदार ललीता कानवडे यांनी सदर केसचे कोर्ट पैरवी म्हणुन कामकाज पाहुन सर्व साक्षी पुरावे विहीत वेळेत योजनाबध्दरित्या हजर केले. त्यामुळे सदर केसचे सुनावणी अंती न्यायालयाने आरोपीस भादवि कलम ३०२ अन्वेय जन्मठेप व २५ हजार रुपयेदंड, दंडन भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *