थेऊर (  हवेलीनामा वृत्तसमूह ) लोणी-काळभोर पोलीसांकडून अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका चालूच असून हद्दीतील सर्वच अवैध धंदेवाईकांचे कंबरडे मोडण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी चंग बांधला आहे.मटका हातभट्टीवर कारवाईनंतर बेटवस्तीवर चालत असलेल्या जुगार अड्डयावर कारवाई करत तिघे जण ताब्यात घेण्यात आले आहेत.

बेट वस्ती, थेऊर फाटा येथील सराईत जुगार चालक माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर निवृत्ती राखपसरे हा बेकायदेशीररित्या मटका व जुगार घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी स्वतः व पोलीस कर्मचाऱ्यांसह सापळा रचुन छापा टाकला.यात १) माऊली निवृत्ती राखपसरे वय ४० वर्षे २) किशन शाहु टिंगरे वय ३९ वर्षे ३) बालाजी धर्मराज माने वय ३३ वर्षे याचे कडुन एकुण ४५५०/-रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे राजेंद्र पन्हाळे पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव पोलीस अंमलदार विर, पाटील, कुदळे, कर्डीले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *