थेऊर -(हवेलीनामा वृत्तसेवा ) जगातील सर्वात मोठ्या लोकशाही संघराज्याचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. थेऊर(ता.हवेली) ग्रामपंचायत येथे सरपंच शितल शरद काकडे यांनी ध्वज पूजन करून ध्ववजारोहण केले यावेळी उपसरपंच आप्पासाहेब काळे,माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य राहूल कांबळे,रुपाली रसाळ,गौतमी कांबळे, चंद्रभागा शिर्के, शशिकला कुंजीर, ग्रामसेवक तुकाराम पाटील,मंडल अधिकारी किशोर जाधव, सरला पाटील, पोलिस हवालदार विजय जाधव,हवेली तालुका आरपीआय चे अध्यक्ष मारुती कांबळे दिलीप लगड, उपस्थित होते.
थेऊर परिसरातील शाळेत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला.
थेऊर जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत सदस्य गौतमी कांबळे, रुपाली रसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आरपीआयचे अध्यक्ष मारुती कांबळे होते.जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या देशभक्तीपर गीते,हिंदी मराठी गीते यावर नृत्य केले भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मेजवानी असल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली होती.यशवंतराव चव्हाण क्रीडा महोत्सवात शाळेतील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केलेल्या सर्व विध्यार्थींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करुन शिक्षकांचे अभिनंदन केले यावेळी केंद्र प्रमुख कटके मॅडम,थेऊरच्या पोलिस पाटील रेश्मा कांबळे, सोमनाथ खंडागळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणजीत काळे,लक्ष्मण चव्हाण,शाहिद अक्कलकोटकर, सोमनाथ खंडागळे,शाळेचे मुख्याध्यापक सातपुते सर, सुर्यवंशी सर,कोष्टी सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेहमान शेख यांनी केले.
