थेऊर – (हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर येथील पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे( शरद पवार) गटाचे उपाध्यक्ष संदीप रामभाऊ कुंजीर यांच्या वाढदिवसानिमित्त  केसनंद येथील निर्मल अनाथालय या लहान मुलांच्या अनाथ आश्रमात कुंजीर यांचा वाढदिवस करण्यात आला.
   वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून आश्रम शाळेतील चिमुकल्यांना दैनंदिन वापरात लागणारी शालेय वस्तू, कपडे, अशा वस्तूरुपी मदत करुन एक कौतुकास्पद उपक्रम राबवून समाजात एक आदर्श निर्माण केला त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 गोड जेवण करून भाऊंचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना कुंजीर यांनी सांगितले की समाजात सामाजिक क्षेत्रात काम करताना समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो आपण आपल्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत केली तर त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य दिसत त्याच आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि समाधान लाभते.
यावेळी जे बी डेव्हलपर्सचे संचालक निलेश चौधरी, पांडुरंग काकडे, दत्तात्रय काकडे, सचिन कुंजीर,मंगेश गायकवाड, तुषार कुंजीर, अनिकेत कुंजीर, दादा साहेब धुमे, शेखर हरगुडे, अजय पवार, मयूर कुंजीर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *