थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर पोलीसांनी हातभट्टी दारुचे अवैध विक्री करणार्या दोन व्यक्तींवर कारवाई करुन ४० लीटर दारु जप्त केली.लोणी-काळभोर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी चार्ज घेतल्यापासून अवैध धंद्यांवर कारवाई चा धडाका लावला असून हद्दीतील अवैध धंदे चालवणार्यांचे धाबे दणाणून गेले आहेत.
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठाच्या आदेशानुसार अवैध धंद्यावर कारवाई सुरु असून आज शनिवारी दि.२५/०१/२०२५ रोजी घोरपडे वस्ती, लोणी काळभोर येथील गोपाल रणजित नट (वय ४० वर्षे) हा गावठी हातभट्टी दारु विक्री करत असल्याची बातमी मिळाल्यानंतर त्याठिकाणी पोलीस अंमलदार दरेकर व रायबोले यांनी सापळा रचुन छापा टाकला.यात दरम्यान त्याच्याकडुन सुमारे २० लीटर गावठी हातभट्टी दारु जप्त करण्यात आली.
तसेच घोरपडे वस्ती लेन नंबर ८ कदमवाकवस्ती येथील कचरदास अर्जुन खरात (वय ६६) हा गावठी हातभट्टी दारु विक्री करत असताना छापा टाकून २० लीटर गावठी हातभट्टी दारु जप्त करण्यात आली.
