थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अट्टल गुन्हेगार शुभम संजय धुमाळ वय २३ वर्षे रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी, पुणे याच्या विरुध्द लोणी काळभोर व परिसरातील विवीध पोलीस ठाण्यात खंडणी, जबरी चोरी, दुखापत यासासरखे गंभिर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीचे स्वरुप लक्षात घेवुन लोणी काळभोर पोलीसांनी त्याचा तडीपारीचा प्रस्ताव पाठवुन जुलै २०२४ मध्ये त्यास पुणे जिल्हा बाहेर तडीपार केले होते. परंतु या आदेशाचा भंग करुन तो वारंवार लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत येत असल्याने त्याचेवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणेच्या दृष्टीने लोणी काळभोर पोलीस ठाणे मार्फत त्याचा एम.पी.डी.ए.प्रस्ताव पाठवीणेत आला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्त यांनी मान्यता दिली.

 

परंतु हा प्रस्ताव मंजुर होताच शुभम संजय धुमाळ हा फरार झाला आणि स्वतः चे अस्तित्व लपवुन तो लपुन बसला होता. त्याने त्याचा मोबाईल व सर्व प्रकारचे संपर्काची साधने बंद केल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यान कालावधीत त्याचे हातुन पुन्हा गंभिर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची दाट शक्यता असल्याचे लक्षात येताच, परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवुन लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी त्याचा शोध घेण्यास स्वतंत्र पथक तयार करुन अहोरात्र मागोवा घेतला. अथक प्रयत्नानंतर लोणी काळभोर चे पथकास फरार शुभम संजय धुमाळ याच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

लोणी काळभोर पोलीसांनी दि. २४/०१/२०२५ रोजी पहाटे म्हातोबाची आळंदी जवळील डोंगरामध्ये असलेल्या गवळेश्वर मंदिरातुन ताब्यात घेऊन एम.पी.डी.ए.प्रास्तावानुसार नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात १ वर्षासाठी स्थानबध्द केले आहे.

ही कामगिरी मनोज पाटील,अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस अमंलदार सातपुते, शिंदे, देवीकर, नागलोत, वाघमोडे, भोसले, नरसाळे, ढमढेरे, विर, कुदळे, पाटील, शिरगिरे, गाडे, कर्डीले म.पो. अमंलदार भोसुरे, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *