थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची संख्या वाढत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नुकताच लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी आपले सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार अवैध धंद्यावर, हातभट्टी दारु, व जुगार अड्डयावर कारवाई करण्यात आली.

लोणी काळभोर पोलीस ठाणेचे हद्दीत वरिष्ठांकडून आदेश मिळाल्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्याची मोहिम सुरु झाली यात दि.२१/०१/२०२५ रोजी रामदरारोड, लोणी काळभोर पुणे येथे एक महिला ही गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करत असल्याची बातमी प्राप्त झाल्याने त्याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पुजा माळी, व सहकारी यांनी सापळा रचुन कारवाई केली. यात एकुण ८८,७००/- रुपयांचा हातभट्टी दारु तयार करण्याचे रसायण जप्त करणेत आले.तसेच दि.१८/०१/२०२५ रोजीच्या कारवाईत महिला आरोपीकडुन एकुण ३२००/- रुपयांची सुमारे ३२ लीटर गावठी हातभट्टी दारु जप्त करणेत आली आहे.

त्याचबरोबर दि.२२/०१/२०२५ रोजी बोस्टन चहाचे पाठीमागे, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, पुणे येथे सराईत जुगार चालक तात्यासाहेब महादेव ससाणे, वय ५० वर्षे रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, पुणे हा बेकायदेशीररित्या मटका जुगार खेळत असल्याची बातमी मिळाल्यानंतर त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तसेच सहकारी पोलीस उप निरीक्षक बोबड, पोलीस उप निरीक्षक जगदाळे, व कर्मचारी यांचेसह सापळा रचुन कारवाई केली. त्याचेकडून ३३५०/- रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले, लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पुजा माळी, पोलीस अंमलदार सातपुते, शिंदे, देवीकर, नागलोत, वाघमोडे, विर, कुदळे, पाटील, शिरगिरे, गाडे, कर्डीले, नानापुरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *