पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पूर्व हवेलीतील विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर ही टोळी शोधून काढण्याची मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते गुन्हे शाखा युनिट 6 यांनी यांनी ही कामगिरी फत्ते करत तांब्याच्या तारा चोरणारी आंतराज्यीय टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून तब्बल १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्या कामगिरीनंतर रोहित्र चोरणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

लोणीकंद व वाघोली पोलीस ठाणे हददीत विदयुत रोहीत्रातील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्हयांमध्ये सतत वाढ होत असल्याने वरिष्ठांकडुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना मिळाल्यानंतर तपास करण्यात येत होता, दरम्यान पोलीस अंमलदार तनपुरे मिळालेल्या गोपनीय माहीती व तांत्रिक तपासाच्या आधारावर युनिट ६ पथकाने अबरार बिलाल अहमद, (वय २४ वर्षे, रा. जमुनी, ता. बांसी, जिल्हा. सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश) आफताब नियामतउल्ला खान,( वय ३२ वर्षे, रा. बोरीगाव, शंकर मंदीराजवळ, उरण, नवी मुंबई), नफीज हमीद अब्दुल, (वय २३ वर्षे, मुळ रा. जमुनी, ता. बांसी, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे) मोबीन हमीद अब्दुल, (मुळ रा. जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुर ता. शिरुर जि. पुणे) यांना अटक त्यांच्याकडून एकुण १२ गुन्हे उघडकीस आणुन १०,४२, २६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी अमितेश कुमार, (पोलीस आयुक्त पुणे शहर) रंजनकुमार शर्मा, (पोलीस सह आयुक्त पुणे), शैलेश बलकवडे, निखिल पिंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ०६चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितिन मुंडे, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, शेखर काटे महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *