पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेलीतील लोणी-काळभोर, लोणीकंद आणि उरुळीकांचन पोलीस स्टेशन हद्दीत अलिकडे विद्युत रोहित्र चोरीच्या घटना वाढल्या आहेत यात महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.इतकेच नाही तर या चोरटय़ांनी भिमा नदीवरील विज पंपावर देखील डल्ला मारला आहे यात अनेक शेतकऱ्यांना हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेकडे पोलीस गांभीर्यपूर्वक कारवाई करणार आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आजपर्यंत अनेक रोहित्र चोरीस गेले आहेत परंतू चोरटे हाती लागलेले नाहीत म्हणजे या घटनेकडे पोलीस गांभिर्याने लक्ष घालत नाहीत का हा प्रश्न उपस्थित होतोय.सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी ही घटना आहे.

नुकत्याच पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीतील धुमाळमळा परिसरातून दोन विद्युत रोहित्र चोरीस गेले तर थेऊर नायगाव रस्त्यावरील एक नविनच उभारण्यात आलेले रोहित्र चोरीस गेले यानंतर तरी याचा शोध घेतला जाणार आहे का.

 

लोणीकंद पोलीसांकडून धडाकेबाज कारवाई करत सात रोहित्र चोरीच्या गुन्ह्याची उकल

 

न्हावी सांडस गावातील शेतक-यांनी शेतीला पाणी देण्यासाठी नदी पात्रालगत बसविलेले कृषी पंपाची तोडफोड करुन त्यामधील तांब्याच्या तारा चोरीस गेलेबबात शेतक-यांनी दिलेल्या तक्रारी नंतर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे व तपास पथक अंमलदार यांना गुन्हेगार शोधून काढण्यासंदर्भात सूचना दिल्या.

             सपोनि गोडसे, पोलीस हवालदार कैलास साळुंके, अजित फरांदे, सागर जगताप, पोलीस शिपाई मल्हारी रापरे, शुभम चिणके, सुधिर शिवले, यांनी मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील केडगाव येथून सापळा लावुन रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश लक्ष्मण धुमाळ, वय २९ वर्ष यास ताब्यात घेवुन अधिक तपास केला असता त्याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.या गुन्ह्यातील त्याचे साथीदार १) सोमनाथ लक्ष्मण जाधव, वय २७ वर्ष, २) तुषार संदिप काळे, वय २८ वर्ष, ३) प्रथमेश बाळासाहेब जाधव, वय १८ वर्ष, ४) शशिकांत शंकर कदम, वय २५ वर्ष, मुळपत्ता मु.पो. मुढाळे, ता. बारामती, जि. पुणे यांच्यासह केला असल्याचे सांगितल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करून ०४ दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली.

           पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल तांब्याच्या तारा (कॉपर) कि रु २७,५००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच चोरीचा माल घेणारा भंगार विक्रेता नासिर अहमद खान, वय ३५ वर्षे रा. नाव्ही सांडस फाटा, नाव्ही सांडस ता हवेली जि पुणे यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

             तसेच तपासात त्यांनी पिंपरी सांडस, न्हावी सांडस, सांगवी सांडस, डोंगरगाव, बुर्केगाव, अष्टापूर, कोलवडी परीसरातील रोहित्र चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून एकूण ४०५ किलो तांब्याचा तारा किमंत ४,२५,०००/-, रुपये असे एकूण ०७ गुन्हे उघडकीस आले आहेत. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

            ही कामगिरी मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, हिमत जाधव पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जेराव कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार सागर जगताप, अजित फरांदे, कैलास साळुंके मल्हारी सपुरे, शुभम चिनके, सुधीर शिवले, चिंतामणी गवळी, किसन मांदळे सर्व लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *