पुणे ( हवेलीनामा वृत्तसेवा) सहकारनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई करत तब्बल दहा लाख पस्तीस हजार रुपये (१०,३५,०००/) किंमतीच्या एकुण दोन हजार सत्तर (२०७०) नकली नोटा जप्त करुन ५ आरोपीस घेतले ताब्यात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.०८ आक्टोबर रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी हद्दीत गस्त घालत असताना पुणे सातारा रोडवरील पद्मावती बसस्टॉपसमोर पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलीक यांना पाहून निलेश हिरानंद विरकर गडबडीने स्वारगेटचे दिशेने जावु लागल्याचा दिसला त्याच्या संशयास्पद हालचाली मुळे त्याला विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता त्याची अंगजडती घेतली असता पेंटच्या खिशात काहीतरी लपवत असल्याचे दिसल्याने खिसे तपासले असता पाचशेचा बंडल मिळून आला त्यास पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, सदरच्या नोटा नकली असुन मी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवुन नकली नोटा चलनात चालविण्यासाठी जवळ बाळगल्या होत्या त्याच्या ताब्यातुन ५००/-रुपये दराच्या एकुण २५० नकली चलनी नोटा जप्त करण्यात आल्या असुन सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करत असताना नकली नोटातील आरोपी निलेश विरकर याला कोपर खेरने नवी मुंबई येथील १) शाहीद कुरेशी २) सैफान पटेल ३) अफजल शहा यांनी त्याला दिल्या असल्याची माहिती त्याने दिली त्यावरुन दि. १९/१०/२०२४ रोजी सैफान कैयुम पटेल (वय २६ वर्षे रा. सेक्टर १२ ई सत्तार पडन बिल्डींग कोपर खेरने नवी मुंबई), अफजल समसुद्दीन शहा (वय १९ वर्षे रा. सेक्टर १२ ई झमझम अपार्टमेंट कोपर खेरने नवी मुंबई) यांना गुन्हयात अटक करण्यात आली असुन शाहीद जक्की कुरेशी (वय २५ वर्षे धंदा चिकन सेंटर रा. सेक्टर १२ ई झमझम अपार्टमेंट दुसरा मजला घर नं.२०२ कोपर खेरने नवी मुंबई) यास अटक करण्यात आली.
आरोपी शाहीद कुरेशी यास विश्वासात घेवुन तपास करता त्याला नकली नोटा शाहफहड अंसारी याचेकडुन आल्याची व त्याचेकडे आणखी काही नकली नोटा असल्याची त्याने माहिती दिली. त्यावरुन दि.२५/१०/२०२४ रोजी शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी वय २२ वर्षे रा. जन्मत वेल्फेअर सोसायटी मीना अपार्टमेंट चौथा मजला रुम नं. ४११ साठी कंपाऊंड नालासोपारा पुर्व पालघर ठाणे यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयात १. निलेश हिरानंद विरकर २. सैफान कैयुम पटेल ३. अफजल समसुद्दीन शहा ४. शाहीद जक्की कुरेशी ५. शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी असे एकुण ५ आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांचे कडुन ५०० रुपये दराच्या १०,३५,०००/-रू. किंमतीच्या एकुण २०७० नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी याचे कडे तपास करता सदरच्या नकली नोटा त्याने दिल्ली तसेच माझीयाबाद, राज्य उत्तर प्रदेश येथुन आणल्याचे सांगितलेने सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पथक गाझीयाबाद, राज्य उत्तर प्रदेश येथे जावुन सदर गुन्हयाचे अनुशंगाने तपास करत आहेत.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ २. श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, उप-निरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पदमाळे, सागर सुतकर, अभिजीत बालगुडे, महेश भगत, खंडु शिंदे, योगेश ढोले यांनी केली आहे.
