पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) लष्कर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोळसा गल्ली येथे अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा यांनी मेफेड्रान विक्री करणाऱ्या दोन जणांना घेतले ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पंधरा लाख सत्तर हजार रुपये किंमतीचे सत्तर ग्रॅम (७०) अंमली पदार्थ जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना दोन इसम संशयास्पद रित्या लष्कर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एम.जी रोड कोळसा गल्ली मध्ये लॉक मेकर्स दुकानाजवळ असल्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी जाऊन १) हुसेन नुर खान (वय २१ वर्षे, रा. नवाझीस पार्क, लेन नं १०, संपन हाईटस, कोंढवा पुणे) २) फैजान अयाज शेख (वय २२ वर्षे, रा. भागोदय नगर, लेन नं ०२, कोंढवा पुणे) ताब्यामधुन १५,७०,०००/-रुपये किमतीचा ऐवज त्यामध्ये ७७ ग्रॅम एम.डी हा अंमली पदार्थ, जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे १. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार संदेश काकडे, विशाल दळवी, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, रेहाना शेख, योगेश मोहीते यांनी केली.
