उरुळी कांचन -(हवेलीनामा वृत्तसेवा) उरुळी कांचन हद्दीतील शिंदवणे घाटात दूध टँकरच्या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सहाच्या सुमारास वाघापूर कडून उरुळी कांचन कडे येणाऱ्या भारत बेंज कंपनीचा दुध टँकर एम एच ४२- ३८०० हा उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटाच्या मध्यभागी माथ्यावर भरधाव वेगाने चालल्यामुळे पलटी होऊन अपघात झाला या अपघातात टँकर चालक व सुपरवायजर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता टँकर चालक कुंवर पाल (वय 35 वर्षे
राजपाल क्योनासूरतपुर हैदरगंज उर्फ अलीगंज, बरेली उत्तरप्रदेश) यांचा मृत्यू झाला असून  वैभव शिवाजी जामदार
(वय 34 रा. बेलवाडी ता इंदापूर जि पुणे)जखमी झाले आहेत. यात दुध टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून गाडीतील रुट सुपरवायजर जामदार गंभीर जखमी झाला आहे पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *