पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२,व गुन्हे शाखेने येरवडा भागात धडाकेबाज कारवाई करत तब्बल २३ लाखाचे मॅफेड्रॉन अमली पदार्थ जप्त केले आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व कर्मचारी येरवडा पोलीस स्टेशनचे हद्दीत गस्तीवर असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर अहमद वाहिद खान, वय ४५ वर्षे, रा. सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर, समता मित्र मंडळ जवळ, येरवडा, पुणे यास ताब्यात घेऊन एकुण २३,३८,४००/-रु.कि.चा मुद्देमाल त्यात २२,००,०००/-रू. कि चे ११० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे.२, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, साहिल शेख, रविंद्र रोकडे, चेतन गायकवाड, अझिम शेख, संदिप जाधव, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड, अमोल गायकवाड, विशाल निलख यांनी ही कारवाई केली.
