पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  धायरी येथील स्वर्गीय बबनराव मणेरे प्रतिष्ठान व ओंम रक्तपेढी यांच्या वतीने दशरथ मणेरे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या शुक्रवारी दि १ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. यात बहुसंख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

         गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोनाचे धुमाकूळ घातला असून पहिल्या व दुसऱ्या लाटे दरम्यान लाँकडाऊन  करण्यात आले त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे यावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री  अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,या अडचणी च्या काळात प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की या महान कार्यात सहभागी व्हावे, कारण केवळ दहा दिवस पुरेल एवढा रक्त साठा राज्यात शिल्लक आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देत धायरीतील समाजसेवक दशरथ मणेरे यांनी आपल्या वाढदिवसाचा इतर कार्यक्रम न घेता रक्तदान शिबीर आयोजनाचे ठरविले.
         हे शिबीर दि १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ४ यावेळेत आयोजित केले आहे याAयाचे उद्घाटन सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्या हस्ते होणार असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,स्वाती पोकळे,प्रभावती भूमकर,नगरसेवक सचिन दोडके,राजाभाऊ लायगुडे,हरिदास चरवड,अश्विनी पोकळे,राजश्री नवले,नीता दांगट,सुनीता डांगे,सुरेखा दमीष्ट, जयश्री पोकळे,तसेच श्रीरंग चव्हाण, भरत कुंभारकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
           हे शिबीर धायरीतील गणेश नगर येथे आयोजित केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *