पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) आंतरराष्ट्रीय कन्या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक बाबांनी आपल्या लाडक्या मुलीचा फोटोसह शुभेच्छा संदेश समाज माध्यमावर झळकावले तसे हे अतिशय भावनिक नाते याचा प्रत्येकाला आदर आहेच पण हे सगळं उच्च शिक्षित व शहरी भागात चाललेली क्रेज आहे असं म्हणावं लागेल.
देशातील शिक्षणाचा टक्का वाढत गेला तसे सामाजिक जीवन हळूहळू बदलत गेले सध्या सर्वच ठिकाणी मोबाईल व इंटरनेट यामुळे क्रांती घडवून आणली शिक्षणाचे स्वरूप बदलत गेले पण हे सगळं मध्यम व उच्च उत्पन्न गटातील माणसांचे,कारण दोन वेळचे जेवण मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या मजुरांची मुले कुठं जाणतात की आज काय विशेष आहे.दिवसभर मिळेल ते काम करायचे आणि संध्याकाळी घरी परतायचे. अशात त्या लहानग्याची होणारी हेळसांड रोजचीच असते.
आजच्या जागतिक कन्या दिनाच्या दिवशी अशाच एका बांधकामावर आपल्या आई वडिलांसोबत आलेल्या एका सहा सात वर्षाच्या लहान मुलीकडे बघून तिची कुटुंबाविषयीची धडपड तिच्या चेहऱ्यावर दिसून येते काखेला वर्ष सहा महिन्यांची बहीण घेऊन तिची देखभाल करत आहे शिक्षण कधी व कुठे पूर्ण होणार याबद्दल कसलीही शाश्वती नाही.
आपण मात्र वेगवेगळ्या जागतिक दिनाचे गोडवे समाज माध्यमावर गात असू.सगळ्याच लहानग्यांना त्याचे स्वतंत्र मिळाले पाहिजे यासाठी समाज म्हणून आपली जबाबदारी आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारे ती पार पडली पाहिजे.
आजच्या आपल्या मुलाच्या फोटोस अनेक लाईक्स मिळाल्या असतील तरीही मजुरांच्या मुलांच्या चेहऱ्यावर लाईक आलं तर या दिवसाचे सार्थक झालं असं म्हणता येईल.
