पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) दोन वर्षापासुन पोलीसांना चकवा देणारा मोका गुन्ह्यातील फरार असलेला येनपुरे गँगचा म्होरक्या पप्पु येनपुरे याच्या भारती विद्यापीठ पोलीसांनी बारामती येथुन मुसक्या आवळल्या

महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा या गुन्हयातील टोळी प्रमुख पप्पु ऊर्फ प्रविण अनंता येनपुरे, वय ३० वर्षे, रा. सच्चाईमाता नगर, आंबेगाव खुगा, पुणे हा गेली दोन वर्षापासुन फरार होता. तो कोणताही समाज माध्यमावर व मोबाईल फोनचा वापर करीत नसल्यामुळे त्यास पकडण्यास अडचणी येत होत्या.त्याला पकडण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीसांनी वेळोवेळी सापळे लावुन त्यास पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो सापडत नसेल.

गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे पप्पु ऊर्फ प्रविण अनंता येनपुरे, याचेकडुन एखादा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची दाट शक्यता असल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी यांना तात्काळ शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार त्याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार, महेश बारवकर, सचिन गाडे, अभिनय चौधरी यांना तो निरा वागस, बारामती, जि. पुणे येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तेथे जावुन त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाईसाठी गुन्हयाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, राहुल आवारे यांच्या ताब्यात देण्यात आले असुन त्यांनी त्यास गुन्हयामध्ये अटक केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *