पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) लोणी-काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चालू असलेल्या अवैध धंद्यांना एका “आका”चा वरदहस्त असल्याची चर्चा होत असून याचा वरिष्ठांकडून शोध घेतला जाणार का हा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या आका ने या अवैध धंद्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.या रक्षकावर कडक कारवाई करण्यात यावी तेंव्हाच या अवैध धंद्यांना आळा बसेल.

लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत सध्या सर्वत्र अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आहेत. पोलीस आयुक्तांनी अशा प्रवृत्तीवर कडक कारवाईचे आदेश दिलेले असताना देखील हे धंदे विना दिक्कतपणे चालू आहेत म्हणजेच याला चांगल्याच वरचढ आका चा आशिर्वाद असला पाहिजे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी या गंभीर प्रश्नावर पोलीस आयुक्तांना पत्र देऊन याची माहिती मागवली आहे.यातून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते.या धंद्यांवरील कारवाई सोबतच त्या आका वर काय कारवाई होणार याचीच उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *